Logo
क्राईम

इचलकरंजी : येथे बँकेने सील केलेला मालमत्तेचा बेकायदेशीर वापर केल्याबद्दल शहापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

एन के जी एस बी बँकेने सील केलेल्या मालमत्तेचा सील तोडून व नोटीस फाडून बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश काशिनाथ खारगे, प्रथमेश प्रकाश खारगे व सुनीता प्रकाश खारगे सर्व राहणार गणेश नगर अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँकेच्या वतीने राज गजानन माने वय 44 राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी एन के जी एस बी बँकेच्या इचलकरंजी शाखेच्या वतीने गट नंबर 728 व सी सह नंबर 223 मधील मिळकत सील केली होती. या मालमत्तेला केलेले सील तोडून व नोटीस फाडुन प्रकाश प्रथमेश व सुनिता या तीघांनी सदर मालमत्तेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल शहापूर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.