Logo
क्रीडा

संगमनेरच्या आदित्य बोरसेची दमदार कामगिरी. काथा व फाइट या दोन प्रकारात सिल्वर मेडल

संगमनेर प्रतिनिधी - नुकत्याच विशाखापट्टनम आंध्र प्रदेश येथे झालेल्या भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम मध्ये कराटे या खेळामध्ये आदित्य बोरसे याने काथा व फाईट या दोन्ही प्रकारांमध्ये सिल्वर मेडल पटकावले या स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यांमधुन स्पर्धक सहभागी झाले होते आदित्यने यापूर्वी देखील गुडग्राम (हरियाणा) येथील नॅशनल स्पर्धेत तसेच पुणे,सोलापूर यांसारख्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन दैदीप्यमान यश पटकावले आहे .आदित्य हा प.पू.गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे ता. संगमनेर ,जि. अहिल्यानगर येथे ११ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. आदित्यचे वडील श्री.संजय बोरसे हे जि.प. प्रा. केंद्रशाळा पिंपरणे येथे मुख्याध्यापकपदी सेवेत आहेत .गीता परिवार संचलित संगमनेर शहरातील गणेश नगर येथे कराटे प्रशिक्षण केंद्रात आदित्य कराटेचे प्रशिक्षण घेत असून त्याला श्री.ऋषिकेश कडुसकर व दत्ता भांदुर्गे प्रशिक्षण देत आहेत.प्रा.अविनाश जोंधळे प्रा. दिलीप डोंगरे , श्री. तथागत रोकडे सरांचेही मार्गदर्शन लाभत आहे .आदित्यच्या या यशाबद्दल संगमनेर पं.स.शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी मा.श्री. बाळासाहेब गुंडसाहेब, विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे मॅडम ,केंद्रप्रमुख श्री.बाळासाहेब जाधव सर, बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष मा.बापुसाहेब देशमुख व सर्व पदाधिकारी प्राचार्य श्री.रमेश वाळे सर, अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक श्री.भाऊराव राहिंज सर, माजी चेअरमन किसनराव खेमनर सर, अंभोरे शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप बेलोटे सर ग्रामविकास अधिकारी श्री.रविंद्र बोर्से साहेब,जि.प.प्रा.शाळा डिग्रसचे मुख्याध्यापक श्री. अजीनाथ घोडके सर,जि.प.प्रा.केंद्रशाळा पिंपरणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी व शिक्षकवृंद तसेच पिंपरणे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक बंधू -भगीनी,प.पू गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी आदित्यचे अभिनंदन करुन त्याच्या भविष्यातील शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.