Logo
ताज्या बातम्या

बुद्धिस्ट यंग फोर्स, कोपरगाव आयोजित भव्य सामनेर शिबिराचा उद्या सांगता समारंभ

कोपरगाव, दि. ३० मे : बुद्धिस्ट यंग फोर्स, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामनेर शिबिराचा सांगता समारंभ रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व धम्ममय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.०० वाजता वृंदावन बँक्वेट हॉल, लक्ष्मणराव कोपरे मार्ग, बैल बाजार रोड, कोपरगाव येथे त्रिसरण पंचशील, बुद्धपूजा, पाठ व सूक्तपठणाने होईल. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक वृंदावन बँक्वेट हॉल येथून निघणार आहे. ही मिरवणूक लोकनेते बाळाभाऊ शिंदे चौक, बँक रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, धम्मदीप बुद्ध विहार (टाकळी नाका) मार्गे पुन्हा वृंदावन बँक्वेट हॉल येथे सकाळी ११.०० वाजता समारोप होणार आहे. यानंतर सकाळी ११.१५ वाजता पूज्य भिक्खू संघास भोजनदान करण्यात येणार असून, सकाळी ११.४५ वाजता प्रमुख पाहुणे व भोजनदान दाते यांचा सत्कार समारंभ पार पडेल. दुपारी १२.०० वाजता श्रामनेर शिबिरार्थी व प्रमुख पाहुण्यांची मनोगते होणार असून, दुपारी १२.३० वाजता पूज्य भिक्खू संघाची धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सांगता दुपारी २.०० वाजता उपासकांच्या भोजनाने होणार आहे. या भव्य धम्ममय कार्यक्रमास पंचक्रोशीतील बौद्ध बांधव, धम्मप्रेमी नागरिक व उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुद्धिस्ट यंग फोर्स, कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.