कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव शहरात अनेक समस्यांनी नागरिक त्रासले आहेत.कोट्यवधी रुपयांचा चुराडा गेले चार वर्षात झाला आहे. आम्हाला सत्ता द्या विकास काय असतो दाखवू असं म्हणणारे स्वतः व प्रशासक गेल्या चार वर्ष मनसोक्त कारभार हप्त आहेत. कुणाच्याही परवानगीची गरज नसताना किंवा नगरसेवकांचे कुठलेही ठरावांची आवश्यकता नसताना चार वर्षात जनतेच्या कराच्या पैशाचा चुराडा करण्याचे पाप झाले आहे.सत्ता स्वतःकडे आहे हे आमदार काळे विसरून बोलत असतील तर हास्यपद्द आहे असे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी भाष्य केले.
रमाई आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांचे घरकुल करण्यासाठी आलेला पैसा विनियोग करता आला नाही म्हणून तो परत गेला. गरिबांचे घर होत नाही मात्र यांच्या पी ए चा अडीच कोटींचा बंगला कशातून पूर्ण होतो हे जनतापुरती ओळखून आहे.
नगरपालिकेत बोकाळलेला पी ए राज मोडित काढण्यासाठी आमचे काम असणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणारा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडे पाहिलं जातं. प्रभाग क्रमांक 14 मध्ये रवींद्र पाठक व राजेंद्र सोनवणे यांचे सर्व समावेशक काम असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, नगरसेवक पदासाठी विद्याताई सोनवणे व अविनाश पाठक यांना भरीव मतदान या प्रभागातून होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त झाला.
अलोट गर्दी कॉर्नर सभेसाठी झाल्याने प्रचाराची सभा नसून विजयाची जल्लोष सभा असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक 14 मध्ये पार पडलेल्या सभेत दिसून आले.सर्वांना सोबत घेऊन चालणे हे आमचे धोरण असल्याने कधीही भेद भावाला थारा कोल्हे कुटुंबाने दिलेला नाही. कोल्हे साहेबांचा नातू म्हणून सर्वांना शब्द देतो कुठलीही दंगल अथवा तेढ निर्माण होऊ दिली जाणार नाही आणि कुणी करत असेल तर त्याला तसे करू दिले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात कोल्हे यांनी सर्वांची मने जिंकली.
मागच्या 21 वर्षात 15 वर्षे काळे कुटुंब सत्तेत आहे.नगरपालिकेत 4 वर्षे प्रशासक सी ओ आणि आमदार काळे यांच्या हातात सर्व सूत्र आहेत मात्र नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी केवळ पालिकेची तिजोरी खाली करण्याचे आणि भ्रष्टाचाराचे प्रकार झाल्याचा घणाघात यावेळी अनेक वक्त्यांनी केला.