Logo
शिक्षण

खिर्डिगणेश जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात डंका

कोपरगाव | प्रतिनिधी कोपरगाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये येसगाव केंद्राची प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खिर्डिगणेश येथील विद्यार्थिनी कुमारी आरती सिंधव हिने उंचउडी (लहान गट मुली) या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून खिर्डिगणेश शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे, क्रीडा विभाग प्रमुख पुनीत पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनीच्या यशाबद्दल गावचे सरपंच चंद्रकांत चांदर, उपसरपंच निलेश वराडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती कोल्हे, सोसायटी चेअरमन चंद्रभान रोहोम, तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, विस्तार अधिकारी संजीवनी अंबिलवादे, येसगाव केंद्र प्रमुख संजय महानुभव यांच्यासह खिर्डिगणेश गावातील ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले. कुमारी आरती सिंधव हिच्या या यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खिर्डिगणेशच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याचा नावलौकिक तालुकाभर पसरला असून तिच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.