Logo
शिक्षण

जिल्हा परिषद देवकर वस्ती शाळेला स्पोर्ट्स ड्रेस चे मोफत वाटप कै. पुरबदादा कुदळे फाऊंडेशनचा उपक्रम

कोपरगाव प्रतिनिधी - आज जि.प.शाळा देवकर वस्ती येथे कै. पूरबदादा कुदळे फाउंडेशन च्या वतीने 25 विद्यार्थ्यांना स्पोर्ट ट्रेस देण्यात आले. प्रसंगी फाऊंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. पद्मकांत कुदळे यांनी सांगितले की तळागाळातील गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी स्वर्गीय पुरब कुदळे यांनी कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या अध्सायक्षपदावरून अनेक उपक्रम राबविले होते. तोच प्रयत्न या फाऊंडेशन च्या माध्यमातून आम्ही करत असल्याचेही ते म्हणाले. या प्रसंगी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कोपरगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. अंबादासनाना देवकर, टाकळी गावचे सरपंच श्री. संदीप देवकर, शिक्षण प्रेमी सदस्य बाळाभाऊ देवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन देवकर श्री. उमेश डमाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत होता. शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी केले तर आभार शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज सोनवणे यांनी कुदळे फाउंडेशन व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.