कोपरगाव प्रतिनिधी - सांगवी भुसार या गावाने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत कोपरगाव तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी भुसार येथे हनुमान मंदीरात कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक दानशूर व्यक्तींनी शाळेला मदतीचा हात दिला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा डिजिटल शिक्षण पध्दती वापरणार आहे. श्री माधवराव आप्पा देशमुख यांनी एक इंटर ऍक्टिव्ह पॅनल व स्व. लिलाबाई पंडितराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी स्वरुपात श्रीम. विद्याताई व श्री.अनिलभाऊ सोनवणे यांनी 51000 व श्री. विनोद कुमार सोनवणे सर 21000 यांच्या देणगीतून इंटर ऍक्टिव्ह पॅनल असे दोन संच चे उद्घाटन करण्यात आले. श्री. माधवराव देशमुख साहेब यांनी अजून एक टीव्ही संच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी भेट दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कष्टकरी, शेतकरी, मजुरांच्या मुलांना तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण मिळणार आहे.
आजच्या कार्यक्रमात बोर्ड चे पाहुण्यांनी अनावरण केले व श्री. घोडे सरांनी पाहुण्यांना प्रात्यक्षिक सादर केले. नंतर हनुमान मंदीरात ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थीनींनी स्वागत गीत गाऊन सुरूवात केली. प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री. माधवराव आप्पा देशमुख, श्री. अनिल भाऊ सोनवणे, श्रीमती. शबाना शेख मॅडम,श्र. संदीपजी दळवी साहेब, श्री. जगन साहेब जाधव आणि कार्याध्यक्ष अध्यक्ष श्री. राजेंद्र बापू जाधव यांचे सत्कार करण्यात आले.
तसेच शाळेला भरीव मदत केलेल्या मान्यवरांचा आणि ग्रामस्थांचे सत्कार करण्यात आले. त्यात श्री. माधवराव देशमुख, श्री. अनिल भाऊ सोनवणे, श्री. विनोद कुमार सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच श्री. वसंतराव देशमुख, श्री. सागर दिलीप गायकवाड, श्री. अमोल भास्कर माळी, श्री. अशपाक तांबोळी, श्री. राजेंद्र मेहरखांब सर , श्री. शशिकांत माळी, श्री. गांगुर्डे सर, श्री. अनिल साळवे, श्री. राजेंद्र बगाटे, श्री. विलास बगाटे,श्री.दत्तात्रय महाले, श्री. किरण खंडिझोड श्री. भाऊसाहेब शिंदे डॉक्टर, आदी देणगीदार ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी भाषणे झाली. त्यात विद्यार्थीनींनी
कु. संचिता दत्तात्रय जाधव, कु. अनुष्का संतोष रोकडे, कु .कस्तुरी संदीप क्षीरसागर, कु .राजविका मोहन जाधव, कु .जान्हवी धनंजय जाधव, कु .शरयू नयन गायकवाड, कु.ईश्वरी प्रशांत कासार यांनी उत्कृष्ट भाषणे केली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले त्याबद्दल त्यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.अनिकेत माळी , प्रतिक्षा साळवे, अक्षरा माळी, विशाल माळी, अनुष्का रोकडे, कस्तुरी क्षिरसागर, रोशन माळी
, ईश्वरी कासार, गार्गी जाधव आदी विद्यार्थी होते.
तदनंतर कवी श्री. नंदकिशोर लांडगे, श्री. सोपान कासार, श्री. बाळासाहेब कासार, श्री. नानाभाऊ जाधव यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच श्री. अनिल भाऊ सोनवणे यांनी आपल्या गावा विषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्री. माधवराव आप्पा देशमुख यांनी आपल्या जीवना विषयी अनेक भावनिक प्रसंग सांगितले तसेच स्व. पंडितराव आण्णा जाधव यांच्या स्मृती जागवल्या. श्रीमती. शबाना शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच इस्त्रो सहलीचा अनुभव सांगितला. कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. संदिपजी दळवी साहेब यांनी राज्य सरकार नाविन्यपूर्ण डिजिटल शिक्षण पध्दती अंगिकारत असताना शाळा बदलत आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रम अध्यक्ष श्री. राजेंद्र बापू जाधव यांनी आपल्या भाषणात देणगीदार मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
खऱ्या अर्थाने आपण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. कारण शिक्षणाप्रती आपण आपली सामाजिक बांधिलकी जपत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले. असे गौरवोद्गार काढले. आजच्या दिवसाचे औचित्य साधून श्री.राजेंद्र मेहरखांब सर यांनी शाळेसाठी पाच हजार रुपयांची पुस्तके शाळेला भेट दिली आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाबासाहेब काळे सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद शाळा शिक्षक वृंद मुख्याध्यापिका श्रीमती. मेघा खंडागळे मॅडम श्री. संतोष गांगुर्डे सर,श्री.शशिकांत माळी सर,श्री.नामदेव सोनवणे सर,श्री,संजय दातीर सर,श्री.बाबासाहेब काळे सर,श्री.बाळासाहेब मोरे सर, श्री.राहुल घोडे सर शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री.जीवन जाधव , ग्रामस्थ , पालक शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सांगवीभुसार यांनी परिश्रम घेतले.