कोपरगाव प्रतिनिधी - नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगेवाडी या ठिकाणी शाळेच्या पालक तथा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला . शाळेचे पालक तथा माजी विद्यार्थी अतिशय समर्पित भावाने मेळाव्यात सहभागी झाले होते. सर्वप्रथम शाळेतील शिक्षक श्री. खंडीझोड सर यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. *त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापिका श्रीम. सोनल साळी यांनी उपस्थितांना प्रास्ताविकात आजच्या मेळाव्याचे प्रयोजन समजावून सांगितले.*
* *शाळेचे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी शाळेसाठी सहकार्य करण्याचे आवाहनाला तात्काळ बुलंद प्रतिसाद मिळून रोख , ऑनलाईन तसेच इतर जाहीर स्वरूपात सात ते साडे हजारापर्यंत रक्कम देणगी स्वरूपात मिळाली .सदर रक्कम माजी विद्यार्थी पालक संघ निधी म्हणून शाळेच्या भौतिक सुविधा करिता वापरण्याचे ठरले त्याच प्रमाणे आज गावात विवाहादी धार्मिक समारंभ कार्यक्रम असल्याने बऱ्याच माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यास येता न आल्याने प्रातिनिधिक स्वरूपातच माजी विद्यार्थी संघ निर्माण करण्याचे ठरले व पुढील काळात पुनश्च एकवार भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरले तसेच सदर मेळाव्यातून शाळेला कंपाऊंड व इतर भौतिक सुविधेसाठी लागणारा सर्वच निधी लोकसहभागातून करण्याचे सर्वानुमते ठरले .**
प्रसंगी ज्ञानेश्वर कांडेकर,रवींद्र कदम, कचरु कांडेकर ,रखमा कदम, नामदेव कदम ,अनिल केरे ,रमेश कांडेकर,गोकुळ कांडेकर, मयूर कांडेकर, रामहरी कांडेकर, डॉ.रामा कांडेकर,दत्तू कांदळकर,दिनेश कांडेकर, संतोष कांडेकर, संदीप कदम ,गणेश कांडेकर, योगेश कांडेकर, सुभाष कांडेकर, दत्तू माळवे,अप्पासाहेब कांडेकर, तेजस पवार,रामनाथ कांदळकर साईनाथ कांडेकर,अशोक कांडेकर,सोमनाथ कांडेकर, अक्षय कांडेकर, लता कांडेकर,मंदा कांदळकर अलका कांडेकर,अक्षदा गोर्डे, दीपाली वामन आदी पालकांची ,माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली
*प्रसंगी उपस्थित सर्वांनी शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले आणि उत्साहात प्रातिनिधिक स्वरूपात मेळावा पार पडला. सूत्रसंचालन श्री.प्रविण खंडीझोड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक साळी मॅडम यांनी मानले*