कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवंगेवस्ती ( मळेगाव थडी ) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संविधान पुस्तिकेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला
शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ मंडळ यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कारभार चालतो सर्व जातीधर्माचा विचार करून राज्यघटना तयार करण्यात आली अधिकार व कर्तव्य त्यात सांगण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी, गायन, नृत्य यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या यात मुलांनी उस्फूर्त सहभाग घेतला सर्वांनी संविधानाचे वाचन केले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती अस्मिता भांगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले