स्फूर्ती नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईत विश्वनाथ विलास लोटे वय 40 राहणार लिंगाडे मळा याच्यासह 19 जणांना अटक केली आहे. तर एक लाख 34 हजार 710 रुपये रोख रक्कम, बारा मोबाईल, सहा दुचाकी हे सर्व मिळून सहा लाख 7 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की इचलकरंजी येथील स्फूर्ती नगर परिसरात विश्वनाथ लोटे यांच्या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री लोटे यांच्या इमारतीवर छापा टाकला आहे. यावेळी अंदर बाहर जुगार खेळताना 19 जण मिळून आले. त्यांच्याकडून एक लाख 34 हजार 210 रुपये रोख, बारा मोबाईल, सहा दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा सहा लाख 34 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 19 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.