इन्स्टाग्रामवरील मैत्रीद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी युवराज आबा गोसावी (रा. वारणा कोडोली) याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. पीडित महिला आणि संशयित युवराज गोसावी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून युवराज याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने पन्हाळा, जयसिंगपूर येथे तसेच पीडितेच्या घरात बलात्कार केला. त्यानंतर लग्न करणार नसल्याचे सांगून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.