बँकेकडे तारण ठेवलेली मशिनरी बँकेच्या परवानगीविना परस्पर अन्यत्र हलवून फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष राजाराम शंकर धारवट यांच्यासह चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सौ. शोभा राजाराम धारवट, रोहन राजाराम धारवट व स्नेहल रोहन धारवट यांचा समावेश आहे. या प्रकरणी सन्मती सहकारी बँकेच्या वर्धमान चौक शाखाधिकारी संदीप बळवंत घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.