इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरातील अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तणूक करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. हा प्रकार १० फेब्रुवारीला झाला आहे. पीडित मुलीच्या आजीने तक्रार दिली आहे. मुलगी घराजवळ उभी होती. त्यावेळी संशयितापैकी एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलास तिथे पाठवले आणि आक्षेपार्ह वर्तणूक केली. याबद्दल जाब विचारण्यासाठी गेल्यावर दमदाटी केली, असे तक्रारीत म्हटले आहे.