रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून शिवाजीनगर पोलिसांनी चार दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून चार मोटारसायकली असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यांमध्ये शहापूर पोलिस ठाण्यातील तीन तर गावभाग पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. १० जानेवारीला आण्णा रामगोंडा शाळेमागील नारळ चौकातून दुचाकी चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हा शोधपथक करत होते.