कापड खरेदी व्यवहारात ५५ लाख १६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील कुणाल अनिलकुमार गुप्ता (वय ३७), नीलम कुणाल गुप्ता (वय ३६) आणि अनिल गिगराज गुप्ता (वय ५७) या तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद दीपक चतुर्भुज मुंदडा (वय ४८, रा. शेळकेनगर) यांनी दिली आहे. मुंदडा यांची योगेश विव्हिंग मिल आहे.