Logo
क्राईम

इचलकरंजी :होळकर चौक येथे गुटख्यासह ५ लाख ३६ हजार १०५ रुपयांचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी केला जप्त

महाराष्ट्र राज्यात गुटखा व सुबंधित तंबाखू व सुपारीच्या साठा विक्री व वाहतूक बंदी असताना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या प्रणव वाळवेकर याला शहापूर पुरुषांनी अटक केली. त्याच्याकडून चार लाखाच्या टेम्पोसह एक लाख 36 हजार 105 रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू सुपारी असा पाच लाख 36 हजार 105 रुपयाचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई होळकर चौक ते खंजिरी पेट्रोल पंप मार्गावर करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आसिफ मोहम्मद यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सदर कारवाई मध्ये पाच लाख 36 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहापूर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. सदर मुद्देमालामध्ये केसरी विमल टेम्पो पत्ती पाकिटे पान मसाला असा पाच लाख 365 मध्ये जप्त करण्यात आला आहे.