Logo
क्राईम

इचलकरंजी स्नॅपचॅट व इंस्टाग्राम वर बनावट खाते तयार करून महिला व मुलींची बदनामी करणाऱ्या वर शिवाजीनगर पोलीसात गुन्हा नोंद

इंस्टाग्राम व स्नॅपचॅट वर बनावट खाते तयार करून त्यावर अल्पवयीन मुलींसह महिलेचे फोटो अपलोड करून त्यांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीने दिले आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी सह तिच्या चुलत बहिणीचे इंस्टाग्रामवर व स्नॅपचॅट वर बनावट खाते उघडून त्यावर फिर्यादी तिची बहीण, चुलत बहीण आणि आईचे फोटो अपलोड करून ते टाकले. त्याचबरोबर त्यांची नाहक बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केला. ही बाब फिर्यादीच्या काही नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. याबाबतची माहिती फिर्यादीस दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसात अज्ञाता विरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 -12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार करीत आहेत.