Logo
क्राईम

इचलकरंजी :शहापुरात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) असे त्याचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शाळेतील अभ्यास पूर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी तेजस याने आपल्या राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.