Logo
क्राईम

इचलकरंजी : सराफी दुकानातून ९२ हजारांचा ऐवज चोरीस

इचलकरंजी येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर असलेल्या गीता नामक सराफी दुकानातून नजर चुकवून चोरट्याने सोन्याच्या धातूचे २० नग बदाम असा एकूण ९२ हजार ९८८ रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबतची फिर्याद अनिल केशव रेवणकर (वय ४३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. सोन्याचे बदाम घेण्याच्या बहाण्याने चोरटा दुकानात आला. अनिल यांच्या पत्नी व दुकानातील कर्मचारी यांची नजर चुकवून त्याने ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली. अधिक तपास पोहेकों उदय पाटील करत आहेत.