Logo
क्राईम

इचलकरंजी :षटकोन चौक परिसरात तलवारीने जीवे मारण्याची धमकी प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल

गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी एक वाजता शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून लाता बुक्यानी मारहाण करण्यासह तलवार घेऊन अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकीत दिल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदर शेख असे त्याचे नाव असून याप्रकरणी अविनाश लोखंडी यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेची नोंद सीसीटीव्ही फुटेज द्वारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तलवारीने जीवे मारण्याची धमकी प्रकरणी तसेच दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीसांनी एकावरती गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे.