Logo
क्राईम

इचलकरंजी : कुटुंब परगावी गेल्याने बंद घराचे कुलूप तोडून १. २० लाखांची चोरी

तारदाळ येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबतची तक्रार फिरोज नदाफ यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामनगर तारदाळ येथे फिरोज हे वास्तव्यास आहेत. ते १७ फेब्रुवारीला सायंकाळी जयसिंगपूरला गेले होते. रविवारी सकाळी ते घरी परतल्यानंतर घराचे कुलूप उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी सोन्याची माळ व हार असे दागिने चोरून नेले.