दारूसाठी पैसे न दिल्याने रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांनी एका तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यात यंत्रमागाच्या लाकडी दांडक्याने झालेल्या जबर मारहाणीत वैभव शिवाजी कोरवी (वय २२, रा. सुतार मळा) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रोहित शनी कांबळे (वय २०, रा. लालनगर) आणि यश अशोक बनसोडे (वय २०, रा. कुष्ठरोग वसाहत) या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित १७ वर्षीय अल्पवयीन आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.