Logo
क्राईम

इचलकरंजी :शहापूर येथील एकजण मारहाणीत जखमी, सहा जणांविरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल

मंगळवार दिनांक सहा रोजी सकाळी दहा वाजता हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील घटस्फोटीत पत्नीशी लग्न केल्याचा राग मनात ठेवून सहा जणांनी लोखंड रोड व दगडाने मारुन एकास जखमी केल्याची घटनेची घटना घडली. आकाश भाऊ डोंगरे असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जैन काशी, शाहीर सय्यद, अमर राठोड, अभिषेक चव्हाण ,व अनोळखी दोन या संशयितांच्या विरोधात शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. आकाश भाऊ डोंगरे याचा मित्र आकाश ठाकरे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी श्री राम नगर येथे विजय खोत यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत उभी होती. त्यावेळी भांडण्यासाठी मुले बोलवत आहे असा गैरसमज करत हातात लोखंडी रोड व दगड घेऊन जवळ आली. त्यातला एक शिवीगाळ करू लागला. एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यांच्या तावडीचा सुटून पळून जात असताना गल्लीच्या कॉर्नरला पडला त्यावेळी सर्वांनी पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर एकाने रोडने डोक्यात मारून त्याला जखमी केले. सदर घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे.