Logo
क्राईम

इचलकरंजी :३६ वर्षीय युवकाची आत्महत्या

इचलकरंजी येथील राजाराम अनिल काळे (वय ३६) यांनी नैराश्यातून आपल्या राहत्या घराच्या जिन्याच्या ग्रीलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची वर्दी विजय बाळासाहेब काळे यांनी पोलिसांत दिली आहे. चार महिन्यांपूर्वी राजाराम काळे यांची हाताची पुढची तीन बोटे मशीनमध्ये सापडून तुटली होती. या नैराश्येतून ही आत्महत्या केली आहे.