Logo
क्राईम

इचलकरंजी :एएससी महाविद्यालय परिसरात पोलीस असल्याचे सांगून नागरिकांस लुटले, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद

इचलकरंजी येथील एएससी महाविद्यालयाच्या परिसरात चंद्रकांत बावणे यांचे किराणा मालाचे दुकान आहे.परिणामी आज दुपारी ते घरी जात असताना त्यांना अचानक मोटरसायकल वरुन दोन अज्ञात आले व त्यांनी आपण पोलीस असून खाली चौकात मोठी दंगल झाली आहे. आपल्या गळ्यातील चीन व अंगठी बांधून ठेवण्यास सांगितले. यावेळी चंद्रकांत बावणे यांनी आपल्या गळ्यातले चीन व अंगठी रुमालात बांधून तोतया पोलिसांच्या कडे दिली. त्यावेळी त्या पोलिसांनी सदर चैन व अंगठी घेऊन तेथुन धुम ठोकली.सदर घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सदर चोरटे कैद झाले आहेत. सदर सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे शिवाजीनगर पोलीस सदर तोतया पोलीस चोरट्यांचे तपास करत आहे.