Logo
क्राईम

इचलकरंजी :मेडिकल, मोबाइल दुकाने उचकटून चोरट्यांनी एक लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवरील मेडिकल आणि मोबाइल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड आणि ३५ हजार १०० रुपयांचे मोबाइल दुकानातील साहित्य असा एक लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मन्सूर अली नबीलाल शेख (वय ३७, रा. गांधीविकासनगर, कबनूर) यांचे कोल्हापूर रोडवर मेडिकल दुकान आहे. दुकानातील विक्री माल तसेच खरेदी मालासाठीचे पैसे ते मेडिकलमध्येच काऊंटर ड्रॉव्हरमध्ये ठेवतात.