Logo
क्राईम

इचलकरंजी :आसरा नगर येथे रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या रागातून घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान व धमकी; गुन्हा नोंद

रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या कारणावरून घरात घुसून शिविगाळ करण्यासह दगड मारून खिडकीची काच आणि टीव्ही फोडून 25000 नुकसान केल्याची घटना घडली आहे‌.या प्रकरणी अनिल दत्तात्रय उनवणे वय 46 राहणार आसरा नगर याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा सुर्याजी साळुंखे वय 55 राहणार मथुरा नगर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, रेशन कार्ड डिलीट करून धान्य बंद केल्याच्या रागातून अनिल सोनवणे यांनी नंदा साळुंखे यांच्या घरात घुसून खिडकीची काच आणि टीव्हीवर दगड मारून तोडफोड केली आहे. तसेच धान्य बंद का केले असे म्हणत साळुंखे यांना शिवीगाळ करत डोक्यात दगड घालतो अशी धमकी दिली आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे.