Logo
क्राईम

इचलकरंजी :कोरोची चिंतामणी नगर येथे चोरी.67 हजारांचे दागिने लंपास, शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कोरोची येथे चोरी. 67 हजाराचे सोन्याचे दागिने लंपास. घरात कोणी नसत्याचे संधी साधत चोरट्याने कोरोची चिंतामणी नगर येतील घराचा कडी कोयंडा उचकटून 67 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी अश्विनी कुमार पाटील यांनी शहापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. चिंतामणी नगर गल्ली क्रमांक पाच मध्ये अश्विनी कुमार पाटील कुटुंबासह राहतात. अश्विनी कुमार पाटील कुटुंबासह मिरज येथे विवाह समारंभासाठी गेले असता तेथे कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात असलेले सोन्याचे दागिने व रोक रक्कम असा 67 हजार रुपये चा मुद्देमाल लंपास केला.याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.