यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी अटक केली. राहुल विनोद पाथरवट (वय २१), अमोल ऊर्फ रवींद्र शिवाजी कामते (वय २४, दोघे रा. आसरानगर इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. यादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून आणखी चार मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोपेड, असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.