गांजा वाहतूक केल्याप्रकरणी निलेश नरेंद्र कांबळे (वय ३१, रा. तीनबत्ती चौक) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १७ हजार ८९५ रुपयांचा १ किलो १९३ ग्रॅम गांजा, १० हजारांचा मोबाईल आणि १ लाख १० हजारांची दुचाकी असा १ लाख ३७ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांना संशयित कांबळे याच्या मोबाईल कॉल्सची तपासणी केली असता, त्यामध्ये त्याने यापूर्वीही गांजा विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.