इचलकरंजी मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या तानाजी साठे व दोन विद्यार्थ्यांना मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देते असे सांगून, 16 लाख 34 हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी, मुंबई विरार येथील यासीन अन्सारी ह्या डॉक्टर महिलेला गावभाग पोलीस इचलकरंजी यांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले आहे. परिणामी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने साठे यांनी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.