Logo
क्राईम

इचलकरंजी :लाचप्रकरणी तलाठी अमोल आनंदा जाधवला पोलिस कोठडी

बक्षीसपत्राने दिलेल्या मालमत्तेची सातबारावर नोंद करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठी अमोल आनंदा जाधव (वय ३९, रा. शहापूर) यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तलाठी कार्यालयातच तक्रारदाराकडून ४ हजारांची लाच घेताना जाधव यास पकडण्यात आले होते. त्याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यास अटक करून येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.