तारदाळ येथील नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रितिका तेजस नलवडे (वय २१, रा. गौरीशंकरनगर) असे नवविवाहितेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. रितिका यांनी गौरीशंकर नगरमधील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या सासरच्या घरी गळफास घेऊन घेतल्याने तिला नातेवाइकांनी आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.