Logo
क्राईम

इचलकरंजी: येथे सोशल मीडियावर मुलीची बदनामी करणाऱ्याला एकाला जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी

रविवार दिनांक 4 रोजी सायंकाळी पाच वाजता सोशल मीडियावर मुलीची बदनामी करणाऱ्या एकाला अटक. सोशल मीडियावर बनावट अकाउंट काढून अल्पवयीन मुलीची बदनामी केल्याबद्दल शिवाजीनगर पोलिसांनी रोहित सुपेकर याला अटक केले.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलगी व तीचे नातेवाईक यांचे सोशल मीडियावर अकाउंट काढून त्यावर फोटो टाकून बदनामकारक मजकूर प्रसारित केला. आणि त्याला लज्जार्पण होईल असे वर्तन केले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीप्रमाणे सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.