Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :येथे 108 कुंडीय गणपती महायज्ञाची महा भंडाऱ्याने सांगता

108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाची महा भंडारांनी समारोप. समस्त जनकल्याण विश्वशांती तसेच पर्यावरण शुद्धीसाठी सुरू असलेल्या दहा दिवसीय भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाची सांगता याग ने झाली.सलग दहा दिवस रुद्र, होम गणेश याग यासह विविध अभिषेक देखील करण्यात आले. पंचगंगा वरद विनायक मंदिर नदी काठावर भव्य यज्ञ शाळा उभारुन 108 होम कुंड साकारण्यात आले होते. महायज्ञ काळात देशभरातील विविध धर्म पंथांच्या संत महतां सह सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर आवारात महासुदर्शन होम, संतान गोपाल, कृष्ण होम, विष्णुसहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. श्री श्री 108 सिताराम दास जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचारी पंडित चिरंजीवी शास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल 108 महंत यामध्ये सहभागी झाले होते. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मोठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योतिर्लिंग नद्या, रामेश्वरम आदि कुंडांचे जल या काळात वापरले गेले. तसेच आयुर्वेदिक औषधी वापर होमहवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांचा एकत्रित केलेल्या मंत्राचारीत पाण्याचा श्रींना जलभिषेक करण्यात आला. दहा दिवसात धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदुसह याग व इतर धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज पंचगंगा नदीच्या काठावर श्री गणपती महायज्ञ पूर्णाहुती व महाभंडार संपन्न झाला. महाभुती भंडारा व पूर्णावती मध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर संत महंतांचे संमेलनही झाले. गणपती महाआरती नंतर 25000 भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला. गेली दहा दिवस श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ यांच्या वतीने महायज्ञ करण्यात आला. त्यासाठी गायत्री सेवा मंडळ, जय जगदंबा सत्संग मंडळ, करंट मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन, केसरवानी समाजसेवक महिला मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी अशोकराव स्वामी, गोविंद बजाज, द्वारकाधीश सारडा गोविंद सोनी, युवराज माळी उपस्थित होते.