Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : आनंद गौरव पुरस्कार वितरण

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषि म. साब यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आनंद गौरव पुरस्काराचे वितरण ऑल इंडिया स्थानकवासी श्वेतांबर जैन संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक अशोक बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते मिठालाल लुंकड (जीवन गौरव), श्रीमती शोभा गुगळे (धार्मिक), अशोक गांधी (उद्योग क्षेत्र), गौतम मुथा (स्वास्तिक) (सामाजिक). कु. राशी पारख (शैक्षणिक) यांना आनंद गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.