प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भाजप प्रभाग अध्यक्ष प्रदीप माळगे यांच्या पाठपुराव्याने आठ नवीन विद्युत पोल मंजूर झाल्या असून आज प्रत्यक्ष कामाला त्याची सुरुवात करण्यात आली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष एडवोकेट अनिल डाळा, शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, युवा जिल्हाध्यक्ष अरविंद माने, युवा अध्यक्ष जयस बुगड, नामदेव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक पंधरा मधील शांतीनगर परिसर, कत्तलखाना रोड परिसरात आंधाराचे साम्राज्य होते. दाटीवाटीचे वस्ती असल्यामुळे नागरिकांना वहिवाटीस अडचण होत होती.ही बाब लक्षात आल्याने भाजप प्रभाग अध्यक्ष प्रदीप मळगे यांनी महापालिकेत पाठपुरावा केला.याकामी तत्कालीन नगराध्यक्ष अलका स्वामी व माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांच्या सहकार्याने आठ विद्युत पोल मंजूर झाले.या कामाचा आज शुभारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी प्रदीप माळगे यांच्या कामाचे कौतुक केले. 45 वर्षाहून अधिक काळ अंधारमय असलेला हा परिसर आता उजळून निघणार असल्याची प्रतिक्रिया दिली.या प्रसंगी भागातील नागरिकांनी बोरिंग व रस्त्याची मागणी केली. त्यावर हाळवणकर यांनी तात्काळ आयुक्तांशी संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचा सूचना केल्या. यावेळी प्रभाग महिला अध्यक्ष राखी गागडे, महेश मीनेकर, राहुल गागडे,चंद्रकांत नगरकर,जगदीश रजपुत आदिंसह भाजप कार्यकर्ते व भागातील नागरिक उपस्थित होते.