वस्त्रनगरीस कायम जागी असणारी नगरी म्हणून परिचित आहे. औद्योगिक शहर असल्याने २४ तास काम सुरू असते. त्यामुळे रात्री-अपरात्री कर्मचारी येत-जात असतात. मात्र, शहरात टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांची दहशत पसरली •आहे. रात्री भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. यावर महापालिका प्रशासन केवळ उपाययोजना करीत असल्याचे भासवत असल्याने वस्त्रनगरीत भटकी कुत्री व मानव असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. वस्त्रनगरीत सूर्य मावळत जाऊन अंधार होण्यास सुरुवात झाली की रस्त्यावर असणारी नागरिकांची वर्दळ कमी होते.