भारतीय सैन्याने एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत एनसीसी कॅडेट्सची थेट भरती केली जात आहे. जर अंतिम निवड झाली तर तुम्हाला सैन्यात लेफ्टनंट पदावर शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे (तात्पुरती) भरती होईल. अविवाहित मुलांबरोबरच मुलीहीलष्कराच्या या प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकतात. ५६व्या एनसीसी स्पेशल एंट्री योजनेसाठी अर्ज भरण्यास ८ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. त्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२४4 आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवाराला सैन्य भरतीचे अधिकृत संकेतस्थळ https://joinindianarmy.nic.in/ ला भेट देऊन अर्ज करावा लागेल.
NCC स्पेशल एंट्री स्कीममध्ये, सर्विस सेलेक्शन बोर्ड सर्व प्रथम मुलाखत घेते. ज्याला थोडक्यात ‘एसएसबी इंटरव्ह्यू’ असेही म्हणतात. ही मुलाखत पाच दिवस चालते. या काळात अनेक प्रकारची शारीरिक आणि मानसिक चाचणी घेतली जाते. सर्विस सेलेक्शन बोर्डाच्या प्रयागराज, भोपाळ, बंगलोर आणि जालंधर केंद्रांवर या मुलाखती घेतल्या जातात. मुलाखतीच्या सर्व फेऱ्या पार केल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. यामध्ये निवड झाल्यास तुम्हाला ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. येथून उतीर्ण झाल्यावर तुम्हाला सैन्यात लेफ्टनंट पदावर भरती होईल. अधिकारी पदावर सैन्यात रुजू झाल्यानंतर, लेव्हल-१० नुसार ५६१०० – १,७७,५०० रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.
अधिसुचना – https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/NOTIFICATION_FOR_NCC_SPL_ENTRY_MEN_-56_COURSE.pdf
वयोमर्यादा
जर तुम्हाला एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय १९ ते२५ वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराचा जन्म २ जुलै १९९९ पूर्वी आणि १ जुलै २००५ नंतर झालेला नसावा.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही विषयात ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण झालेले ५६ व्या एनसीसी विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच एनसीसी सी प्रमाणपत्र परीक्षा बी ग्रेडसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती पदांची भरती होणार आहे
NCC स्पेशल एंट्री स्कीमद्वारे पुरुषांसाठी ५० आणि महिलांसाठी ५ जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण ५५ उमेदवारांची निवड केली जाईल.