Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : इचलकरंजीत भाजपाच्या वतीने विजयोत्सव साजरा

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकवला. याबद्दल भाजपचे इचलकरंजी शहराध्यक्ष पै. अमृत 'भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहाजी भोसले, अनिल डाळ्या, अध्यक्ष अशोक स्वामी, जयेश बुगड, सौ. अलका स्वामी, सौ. पूनम जाधव, सौ. अश्विनी कुबडगे, सौ. योगिता दाभोळे, सौ. नीता भोसले, सौ. संगीता कांबळे, मधुमती तोरगुले सौ. संगीता घोरपडे, शबाना शहा, गंगा पाटील, पांडुरंग म्हातुकडे आदींसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.