केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश झाला असून २५ इलेक्ट्रॉनिक बस लवकरच मिळणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता, त्याला यश आले असल्याचे खा. माने यांनी सांगितले. शहरामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन डेपो इमारत व चार्जिंग स्टेशनसाठी निधी मागणीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.