इचलकरंजी येथील पंचगंगा नदीकाठावर सुरु असलेल्या भव्य १०८ कुंडीय श्री. गणपती महायज्ञ सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात योग व ध्यान शिबिराने झाली. आर्ट ऑफ लिव्हींगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. सकाळी आठ वाजता श्री श्री १०८ सीतारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री 108 गणपती महायज्ञस सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात संवित कैलासचंद्र जोशी (जोधपूर) यांच्या गणपती महापुराण कथेला महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.