लाल समुद्रातील व्यापारी जहाजावर हुथींच्या हल्ल्याचा भारतासह तेल आयात करणाऱ्या देशावर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे तेलाच्या किमतींमध्ये 10-20 डॉलरने वाढ होण्याची शक्यता असून, हे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरेल, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) अध्यक्ष बोर्गे ब्रेडे यांनी सांगितले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडे ने दिले आहे. WEF चे अध्यक्ष बोर्गे बैंडे हे स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरात आजपासून सुरू होत असलेल्या 54 व्या WEF वार्षिक जागतिक आर्थिक बैठकी दरम्यान ते बोलत होते.
येमेनच्या हुथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील व्यापारी जहाजावर वारंवार हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेकडून देखील हुथी बडखोरांना लक्ष्य करण्यात आले. या हत्यानतर पुन्हा हुथींनी जोरदार प्रतिउत्तर दिले. यामुळे लाल समुद्रातील तणाव प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम तेलाच्या किंमतीचर होण्याची दाट शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी वर्तवली आहे.
हुथी बडखोरांकडून व्यापारी जहाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे सात समुदात सुरू असलेल्या तणावाचा जागतिक पुरवठा साखळीवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे भातासारख्या रोल आयात करणाऱ्या देशासाठी तेलाच्या किंमतीत 10-20 डॉलरपर्यंत वाढ होण्याची शकतात आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असे देखील वोर्ने वेडे यांनी म्हटले आहे.