मोबाईल खरेदी करून पैसे न देता फसवणूक करणाऱ्या दोघांवर शहापूर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील सुनील गाडेकर (रा. सुभाषनगर, कोल्हापूर), आशिष गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. यातील गाडेकर याला अटक केली असून त्याचा शाहूपुरी पोलिसांनी ताबा घेतला आहे. तर गायकवाड हा पसार झाला आहे. चार दिवसांपूर्वी दोघांवर तारदाळ येथील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दोघे सोशल मीडियावरील ओएलएक्स अॅप्लिकेशनद्वारे मोबाईल खरेदी करून पैसे न देता फसवणूक करत असत.