राज्यातील 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ऑगस्टमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यात 1 हजार 624 मुले व 1 हजार 590 मुली अशी एकूण 3 हजार 214 मुले शाळाबाह्य आढळल्याची धक्कादायक कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. यात संपूर्ण मुंबईत 356 बालके शाळाबाह्य असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला केसरकर यांनी उत्तर दिले.राज्यातील अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या 661 शाळांपैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.