Logo
राजकारण

नगरपालिका निवडणूक 2025 : ‘खर्चमोजणीचा मेनू’ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले जाहीर.

अहिल्यानगर - आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीदरम्यान उमेदवारांना लागू होणारे वस्तुनिहाय खर्चाचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 👉 प्रचारातील प्रमुख दर ☕ चहा : ₹10 🍛 पोहे : ₹20 🥗 व्हेज थाळी : ₹180 🍗 नॉन-व्हेज थाळी : ₹240 🛡️ अंगरक्षक (प्रति दिवस) : ₹1,000 👉 जाहिरात, पोस्टर, बॅनर, रॅली, वाहन, मंडप, फेटे, हार, ध्वनीक्षेपक यांचेही एकसमान दरपत्रक लागू 📝 प्रत्येक खर्चाची पारदर्शक नोंद अनिवार्य! अर्ज दाखल होताच खर्च नोंदणी रजिस्टर दिले जाणार राष्ट्रीयकृत/सहकारी बँकेत स्वतंत्र खाते आवश्यक उमेदवारांनी ठरलेल्या दरांपेक्षा कमी दर दाखविणे मान्य होणार नाही 🔍 जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी, श्रीगोंदा आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. “प्रत्येक उमेदवाराने खर्चाची अचूक व वेळेवर नोंद ठेवणे अत्यावश्यक” आहे असेही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले.