प्रतिनिधी, अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक,माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला. सिंचन भवन, संभाजीनगर रोड येथून निघालेल्या या भव्य मोर्चात जिल्ह्यातील सुमारे 4000 प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. समन्वय समितीचे नेते श्री सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना श्री सुनील पंडित यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शिक्षकांना टीईटी सक्ती विरोधात आंदोलनात उतरण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे नेते श्री बापूसाहेब तांबे यांनी यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षकांनाच टी.इ .टी सक्ती का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशातील सर्व संवर्गाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही ही सक्ती का केली नाही याबद्दल सवाल उपस्थित केला. जुनी पेन्शन बंद करून देशातील सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना सरकारने फसवण्याचे पाप केले आहे. जर सरकारने यापुढील काळात टीईटी सक्ती मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.माध्यमिक चे नेते श्री आप्पासाहेब शिंदे यांनी आक्रमक भाषण करताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. गोरगरीब जनतेच्या मुलांना आम्ही इमाने इतबारे शिकवत असताना अनुभवाची कदर न करता लहान मुलांप्रमाणे शिक्षकांना अभ्यास करण्याची वेळ या राज्य शासनाने आणलेली आहे. सरकारला शिक्षकांना मुलांना शिकवू द्यायचे की नाही हेच आम्हाला समजत नाही . शिक्षकाच्या घरात आज नातू आजोबाला आणि वडिलांना विचारत आहेत ,बाबा तुम्ही कशाचा अभ्यास करता ?ही वेळ फक्त राज्य शासनाने आमच्यावर आणली आहे अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. व राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी श्री महेंद्र हिंगे यांनी राज्यातील सर्व आमदार, खासदार अधिकारी, पदाधिकारी यांनाही विविध परीक्षा सक्तीच्या कराव्यात अशी मागणी केली., यावेळी गोकुळ कळमकर , विकास डावखरे , शेखर उंडे ,अमोल पवार, श्री प्रसाद शिंदे ,वैभव सांगळे, मनीषा वाकचौरे, उत्तरेश्वर मोहोळकर, के. सी. देशमुख,विठ्ठल उरमुडे यांची मनोगते झाली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी यावेळी मोठ्या हिरीरीने या आंदोलनात सहभागी झाल्या सिंचन भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता आंदोलनाने दुमदुमून गेला. वाहतुकीस कोणताही अडथळा न आणता शिस्तबद्ध पद्धतीने जिल्ह्यातील हजारो शिक्षक बंधू भगिनींनी अभूतपूर्व अशा या मोर्चात हातात विविध प्रकारच्या मागण्यांचे फलक तसेच मूकमोर्चाचा फ्लेक्स हातात घेऊन सहभागी झाले.तसेच राज्य शासनाला यापुढील काळात तीव्र आंदोलनाचा गर्भित इशाराच या आंदोलनातून दिला. राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने श्री निमसे साहेब व तळे कर साहेब यांनी तर ग्रामसेवक युनियनच्या वतीने श्री युवराज गोकुळ पाटील यांनी या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.यावेळी श्री बबन दादा गाडेकर ,दत्ता पाटील कुलट ,गोरक्षनाथ विट नोर ,नारायण पिसे ज्ञानेश्वर शिरसाठ, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात ,कल्याण लवांडे, प्रकाश नांगरे ,राजेंद्र ठोकळ, बाळासाहेब कापसे, राजेंद्र सदगीर ,कल्याण लवांडे, संतोष खामकर विजय काटकर ,संतोष दुसुंगे,सुभाष येवले ,अमोल क्षीरसागर आबासाहेब दळवी, मनोज सोनवणे,नवनाथ अडसूळ,प्रवीण झावरे, नाना गाढवे , साहेबराव अनाप ,संतोष सरवदे, शरद वांडेकर, बाबा आव्हाड, पारुनाथ ढोकळे, अन्सार शेख, बाळासाहेब कदम,राजेंद्र निमसे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.