Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : मोका गुन्हा अंतर्गत चार वर्षे फरार असणारा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे न्यायालयात हजर

मोकाच्या गुन्हात चार वर्षाहुन आधीक काळ फरार असणारे माजी नगरसेवक सुनील तेलनाडे स्वतः हुन इचलकरंजीत विशेष मोका न्यायालयासमोर हजर झाला. न्यायालयने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्याचा जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याबाबतची माहिती एडवोकेट सचिन माने यांनी दिली. दरम्यान सुनील तेलनाडे हजर झाल्याचे समजतात न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. कौटुंबिक वादात समेट घडवून आणण्याच्या नावाखाली 25 लाख रुपये ची खंडणी वसुलीसाठी मारहाण केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात मे 2019 मध्ये माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या सह 12 जनांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्हाच्या अनुषंगाने तेलनाडे च्या एसटी सरकार गॅंग वर मोका लावण्यात आला. गुन्हातील संजय तेलनाडे यांच्यासह अन्य संशयीत जामिनावर मुक्त आहेत. दरम्यान संशयीत सुनील तेलनाडे हा फरार होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल झाले आहेत. परिणामी विशेष मोका न्यायालयासमोर तो स्वतःहून हजर झाला. हजर झाल्याचे समजताच पोलीस यंत्रणेची धावाधाव झाली. तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक समरसिंह साळवी पथकासमोर दाखल झाले. विशेष मोका न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत एडवोकेट सचिन माने यांनी युक्तिवाद केला.त्यानंतर न्यायालयाने तेलनाडे याला कोठडी सुनावली. त्यानंतर त्याच्या जामीनचा अर्ज ठेवण्यात आला.या अनुषंगाने पोलिसांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.