त्या व्यक्तींना बेघर निवारा केंद्रात सोडण्याचे आवाहन घरातील वयोवृध्द व्यक्तींना कंटाळून अनेकजण त्यांना निर्जनस्थळी सोडत आहेत. त्याऐवजी नको असलेल्या व्यक्तीला बेघर निवारा केंद्रात सोडावे. जेणेकरुन त्यांची देखभाल होऊन त्यांना त्यांचे जीवन जगता येईल, असे आवाहन माणुसकी फौंडेशनचे सदस्य रवि जावळे यांनी केले आहे. त्याचबरोबर वयोवृध्दांना निर्जनस्थळी सोडण्याचा प्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जावळे यांनी दिला आहे.