भारतातील पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी २०२६ पर्यंत रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. यासाठी भारताची सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो को ऑपरेट करणारी कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायजेसने अमेरिकेतील आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली आहे.करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी आपले मत जाहीर केले आहे. देशाला क्रांतिकारक ट्रान्सपोर्टेशन सॉल्यूशन पुरवठा करणे हे आमचे लक्ष्य आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आर्चरच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अॅण्ड लॅण्डिंग मिडनाईट एअरक्राफ्टद्वारे ही एअर टॅक्सी सेवा दिली जाईल.दिल्लीतील कॅनॉट प्लेसपासून गुरुग्रामपर्यंतचे अंतर २७ किमी आहे. रस्ते मार्गाने हे अंतर कापण्यासाठी ६० ते ९० मिनिटे लागतात; पण इलेक्ट्रिक एअर टॅक्सी हे अंतर ७ मिनिटांत कापेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
मिडनाईट एअरक्राफ्ट हे एकामागून एक उडाण भरू शकते. अगदी हेलिकॉप्टरप्रमाणेच हे व्हर्टिकल टेकऑफ आणि लॅण्डिंग करू शकते. याला रन-वेची गरज नाही. आर्चरचे दोनशे मिडनाईट एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी निधी जमवण्याची योजना आखण्यात आली आहे.